येवला ( नाशिक ) : येवला तालुक्यातील आडगाव चौथा येथील उत्तम खोकले या शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या पडला होता. याची माहिती शेतकऱ्याने त्वरित वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद करत विहिरीच्या बाहेर ( Leopard Caught In Yeola ) काढले. या बिबट्याला निफाड येथे रवाना करण्यात आले आहे.
Leopard Caught In Yeola : येवल्यात विहिरीत पडला बिबट्या, अन् वनविभागाने केला जेरबंद
नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात एका शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद ( Leopard Caught In Yeola ) केले.
60 फूट विहिरीत पडला बिबट्या..
तालुक्यातील उत्तम खोकले यांचा मुलगा सकाळी विहिरीतून पाणी आणण्यास गेला असता विहिरीत कोणतातरी प्राणी पडला असल्याचे लक्षात आले. त्याने भावाला सांगताच या दोघांनी विहिरीत बघितले. त्यावेळी बिबट्या दिसून आला. त्यांनी गावातील पोलीस पाटलांना याची माहिती दिली. त्यांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला देताच वनविभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पथकाने विहिरीत पिंजरा सोडला असता त्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला. त्यानंतर बिबट्यास वनविभाग ताब्यात घेऊन तपासणी करून निफाड वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
TAGGED:
Leopard Caught In Yeola