नाशिक- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेवगे-दारणा येथे जनावरांच्या गोठ्यात मृत बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. काल (शुक्रवार) दुपारी येथील शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी वनविभागास माहिती दिली घटनास्थळी वनविभागाचे पथक बचावकार्यालासाठी दाखल झाले होते. मात्र, या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बिबट्याच्या मानेजवळ गेल्या काही महिन्यांपासून गंभीर दुखापत झाली असल्याचे निदर्शनास आले. तसेच उपासमारीने मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहिती अशी की, काल (शुक्रवार) सकाळी शेवगे दारणा परिसरात जनावरांच्या गोठ्यात बिबट्या आढळून आले. घटनेची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांना बिबट्या मृतावस्थेत मिळून आला.