नाशिक - निफाड तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात असलेल्या करंजी खुर्द गावालगत खैरे पार्क परिसरात ५ ते ६ बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद झाला आहे. अमोल आणि वैभव निंबाळकर यांनी गुरुवारी रात्री गाडीतून हे दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केले.
निफाड भागातील गोदाकाठ परिसरात ५ ते ६ बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद - godavari
या परिसरातून जाताना अनेक वेळा बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केले असून त्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद
बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद
त्यांनी याची माहिती तातडीने वन विभागाला दिली आहे. या परिसरातून जाताना अनेक वेळा बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केले असून त्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्यांनी या परिसरात आत्तापर्यंत अनेक मोकाट जनावरांची शिकार केले आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. वन विभागानेही अनेक दिवसांपासून या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावलेले आहेत. बिबटे अजुनही पकडण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.