नाशिक -इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटे गावात एका घरात बिबटया शिरल्याने खळबळउडाली आहे. घरात लपून बसलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून वनविभागा कडून बिबट्या जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
नाशिकच्या तालुक्यातील पिंपळगाव भटाटे गावात राहणाऱ्या गोविंद इंडोळे या शेतकऱ्यांच्या घरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. गोविंद इंडोळे हे सकाळी कुटुंबा समवेत शेतात काम करण्यासाठी गेल्या नतंर बिबट्या घराच्या मागच्या दरवाजाने आता घुसला आणि स्वयंपाक घरातील एका कोपऱ्यात जाऊन बसला. गोविंद हे पुढच्या दरवाजाने आता येताच त्यांना बिबट्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी माघारी फिरून दरवाजा लावून घेतला. याची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन विभागाची टीम तेथे दाखल झाली. बिबट्या घरात घुसल्याची बातमी गावात पसरताच नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. वन विभागे घरच्या दरवाजाला पिंजरा लावला असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहे.मात्र, आता आधार झाल्यानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्याची मोहीम थांबवण्यात आल्याचे समजते आहे. उद्या सकाळी बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून जेरबंद केले जाईल असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.