महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या पिंपळद गावात बिबट्याचा धुमाकूळ; श्वानावर केला हल्ला - पिंपळद बिबट्या हल्ला न्यूज

मानव आणि वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते आहे. यात प्रामुख्याने बिबट्या आणि मानव यांचा संघर्ष जास्त आहे. नाशिकच्या पिंपळद परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे.

leopard
बिबट्या

By

Published : Jan 22, 2021, 11:25 AM IST

नाशिक - पिंपळद गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील शेतकरी तुकाराम दुशिंगे यांच्या घरा बाहेर झोपलेल्या श्वानावर बिबट्याने हल्ला केला. श्वानाला मारून ओढून नेतानाचा बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बिबट्याने केला श्वानावर हल्ला

घटना सीसीटीव्हीत कैद -

पिंपळद गावामध्ये गेल्या काही दिवासांपासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. या परिसरातील शेतकरी तुकाराम दुशिंगे याच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत बिबट्या झोपलेल्या श्वानावर हल्ला करत असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले आहे. मागील वर्षी याच परिसरात एक मादी बिबट्या वन विभागाने जेर बंद केला होता. असूनही या परिसरात काही बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. बिबट्यांच्या मुक्तसंचारामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तीन-चार ठिकाणी पिंजरे लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details