महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या जबड्यातून मामाने वाचवले भाचीचे प्राण... इगतपुरीत दहशत - nashik leopard news

इगतपुरी तालुक्यातील आधारवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांची जया चवर नामक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान दाखवत मामाने धाव घेतली. यामुळे बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका झाली.

leopard attacked girl in nashik
बिबट्याच्या जबड्यातून मामाने वाचवले भाचीचे प्राण... इगतपुरीत दहशत

By

Published : Nov 11, 2020, 3:34 PM IST

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील आधारवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांची जया चवर नामक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान दाखवत मामाने धाव घेतली. यामुळे बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका झाली.

बिबट्याच्या जबड्यातून मामाने वाचवले भाचीचे प्राण... इगतपुरीत दहशत
इगतपुरी तालुक्यातील आधारवाड गावात आजोबांच्या घरी आलेली जया लहान मुलांसोबत घराबाहेरील शेतात खेळत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिची मान जबड्यात पकडली. फरफट शेतात नेत असताना जयाचा ओरडण्याचा आवाज आला. यावेळी बाजूलाच काम करत असलेल्या मामाने प्रसंगावधान दाखवत तात्काळ बिबट्याच्या दिशेने धाव घेऊन दोनशे मीटर अंतरावर जाऊन बिबट्याच्या जबड्यातून जयाला ओढले. मामाने देखील आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. या घटनेत जयाच्या मानेला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्या असून तिला प्राथमिक उपचारासाठी घोटीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र जखमा खोलवर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर प्रकृती
सुधारत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

वन विभागाने पिंजरा लावावा


आधारवाड गावात याआधी बिबट्याने शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता हा बिबट्या माणसांवर हल्ला करतोय. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी जयाचे आजोबा सीताराम रण यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details