महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्यात शेतकरी जखमी; नाशिकमधील प्रकार

दामू गायकवाड हे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दूध घेऊन जात होते. यावेळी हस्ते दुमाला गट नं २४२ मध्ये पाठीमागून मानेवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

leopard attack on farmer in nashik, farmer injured
जखमी शेतकरी दामू गायकवाड

By

Published : Jan 7, 2020, 2:09 PM IST

नाशिक - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथे घडली. दामू दगडू गायकवाड असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

दामू गायकवाड हे सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान दूध घेऊन जात होते. यावेळी हस्ते दुमाला गट नं २४२ मध्ये पाठीमागून मानेवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. वनविभागाचे चौसाळा राऊंडचे वनपाल बि. एम. बुरूंगुले यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी दामू गायकवाड यांच्याकडून हल्याची माहिती घेतली.

हेही वाचा -ठाण्यात रेशनकार्डची होळी करत नागरिकांचे आंदोलन; धान्याचा अपहार होत असल्याचा आरोप

सदर घटनेसह दिंडोरी तालुक्यात आणि परिसरात बिबट्याच्या हल्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच परिसरात घबराट पसरली आहे. यामुळे परिसरात वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details