नाशिक - कळवण तालुक्यातील बार्डे गोसराणे शिवारात मागील आठवड्यात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होता. त्यातच आता पुन्हा एक बिबट्या परिसरामध्ये आढळून आला आहे. गोठ्यातील गायीवर हल्ला करण्याचा प्रयत्न या बिबट्याने केल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
नाशिकमधील गोसराणे शिवारात बिबट्याचा थरार ; गोठ्यातील गायींवर हल्ल्याचा प्रयत्न - गोसराणे शिवारात बिबट्याचा थरार
बार्डे गोसराणे शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा थरार पाहायला मिळाला आहे. गोठ्यातील गायीवर हल्ला करण्याचा प्रयत्न या बिबट्याने केल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
![नाशिकमधील गोसराणे शिवारात बिबट्याचा थरार ; गोठ्यातील गायींवर हल्ल्याचा प्रयत्न बिबट्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8859761-656-8859761-1600509456872.jpg)
कळवण तालुक्यातील बार्डे, गोसराणे शिवारातील पंडित रामभाऊ वाघ यांच्या शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचा थरार कैद झाला आहे. मागील आठवड्यात सोमवारी वाघ यांच्या घराजवळ कनाशी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात, तब्बल दीड महिने हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.
नविन बिबट्याच्या दर्शनाने शिवारात पुन्हा भितीचे सावट पसरले आहे. बिबट्याने गोठ्या भोवती असलेल्या सातफुटी संरक्षक जाळीवरून उडी घेत गोठ्यातील गाईवर जोरदार हल्ला केला. मात्र, गाईची जीव वाचविण्याची धडपड केल्यानंतर बिबट्याने कुत्र्याची शिकार केली. याआधीही शिवारातील विश्वास मोरे, किशोर वाघ, बळीराम मोरे या शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्या आढळला होता.