महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांभाळण्याची गरज - छगन भुजबळ येवला (नाशिक) :महाविकास आघाडीच्या पक्षाने त्यांच्या नेत्यांना तसेच काँग्रेसने देखील त्यांच्या नेत्यांना सांभाळले पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज येवला दौऱ्यावर आले आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर तांबे यांच्या येवल्यातील सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या. हे बघण्यापेक्षा शुभांगी पाटील यांच्या मतपेटीत भरघोष मतदान करावे असे भुजबळ म्हणाले.
महाविकास आघाडीतच्या नेत्यांना सांभाळा : काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे येवला दौऱ्यावर आले होते. त्यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी दिसते का? असा प्रश्न भुजबळ यांना विचारला असता भुजबळ म्हणाले की, सत्यजित तांबे पहिले काँग्रेसमचे नेते होते.
रिकाम्या खुर्च्या मी पाहत नाही : त्यामुळे इतरही महाविकास आघाडीच्या पक्षांनी तसेच काँग्रेस पक्षांनी त्यांच्या नेत्यांना सांभाळावे असे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. आमदार सुधीर तांबे यांच्या सभेतील रिक्त खुर्च्याबाबत त्यांना विचारले असता भुजबळ म्हणाले, कोणाच्या जागा रिक्त आहेत हे मी पाहिले नाही, जागा रिक्त आहेत की, नाही हे पाहण्याऐवजी मी सोशल मीडियावर पाहतो.
प्रचाराला सुरुवात :विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत मतदारांना बॅलेट पेपरद्वारे आपला हक्क बजावता येणार आहे. यामुळे त्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पुढीलप्रमाणे राहील.
मतदारसंघातील पदवीधर मतदारांची संख्या : सहायक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी मतदारांची माहिती दिली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून नाशिक विभागात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार आहेत. तसेच प्रभागातील सर्वाधिक मतदार हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. अहमदनगरमध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652, जळगाव जिल्ह्यात 35 हजार 58, धुळे जिल्ह्यात 23 हजार 412, नंदुरबार जिल्ह्यात 18 हजार 971 मतदार आहेत.
एकूण मतदान केंद्रे : राज्य निवडणूक आयोगाकडून नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. तर विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.
हेही वाचाल -Pariksha Pe Charcha: ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी झाले पंतप्रधानांच्या 'परीक्षा पे चर्चा'मध्ये सहभागी, मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती