महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, वाहतूक धिम्या गतीने - Kasara Ghat nashik

नाशिकच्या कसारा घाटातील जव्हार फाट्या जवळ नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावर पहाटे 5 वाजता बाजूला असलेल्या डोंगरावरून दरड व माती कोसळण्याची घटना घडली, यात रेल्वे ट्रक वर मोठया प्रमाणात मातीचा ढिगारा तयार झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, आरपीएफ, व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.

landslide on railway line In Kasara Ghat nashik
कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली

By

Published : Jul 19, 2021, 12:00 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ डाऊन मार्गाच्या रेल्वे लाइनवर पहाटे 5 वाजता दरड व झाड कोसळ्याची घटना घडली. दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून अप व डाऊन मार्गाची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

डाउन मार्गावरील गाड्या मिडल मार्गावर वळविल्या -

नाशिकच्या कसारा घाटातील जव्हार फाट्या जवळ नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावर पहाटे 5 वाजता बाजूला असलेल्या डोंगरावरून दरड व माती कोसळण्याची घटना घडली, यात रेल्वे ट्रक वर मोठया प्रमाणात मातीचा ढिगारा तयार झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, आरपीएफ, व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिमाण झाला असून अप व डाउन मार्गाची वाहतूक धीम्या सुरू असून सर्व प्रकारच्या गाड्या एक ते दीड तास उशिरणे धावत आहे. मात्र, माती हटवण्यास वेळ लागला तर डाउन मार्गाच्या गाड्या अजून उशिराने धावण्याची शक्यता आहे. यावर पर्याय म्हणून डाउन मार्गाच्या गाड्या मिडल मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

घाटातून नाशिककडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू -

नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या कसारा घाटात हिवाळा पुलाच्या पुढील वळणावर काल रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी दरड कोसळून माती व दगडाचे ढिगारे रस्त्यावर आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन ग्रुपच्या सदस्यांनी कसारा पोलिसांना दिली. यावेळी तातडीने मदत कार्यासाठी कसारा पोलीस निरीक्षक नाईक व आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे सदस्य शाम धुमाळ व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घाटातून नाशिककडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details