नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी रेल्वेरुळावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
इगतपुरी येथे लोहमार्गावर दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली - land slide
इगतपुरी रेल्वेरुळावर शुक्रवारी पहाटे 5:30 च्या सुमारास दरड कोसळली. रेल्वे आपत्ती व्यवस्थापनाला माहिती मिळताच, कर्मचाऱ्यांनी दीड तासात दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.
दरड कोसळली
इगतपुरी येथील रेल्वे रुळावर सकाळी ५:३० च्या सुमारास दरड कोसळली. हा प्रकार देवगिरी एक्सप्रेस जात असताना चालकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती रेल्वे आपत्ती व्यवस्थापनास दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीड तासात रुळावरील दरड हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दैवगिरी एक्सप्रेच्या चालकाने माहिती दिल्याने या घटनेत जीवितहानी टळली आहे.
Last Updated : Jul 26, 2019, 12:27 PM IST