नाशिक(दिंडोरी) - निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावक्षेत्रामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अति वेगाने वारे वाहण्यास आणि पावसाला सुरवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावर दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
सप्तश्रृंगी गडावर दरड कोसळली; जिवीतहानी नाही
मंगळवारी मध्यरात्रीपासून नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावर दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
दरड कोसळली
नांदुरी ते सप्तशृंगी गड या घाट रस्त्यावर गणपती घाट व रतनगड परिसरात मोठी दरड कोसळली. कोरोनाच्या संसर्गामुळे सप्तशृंगी देवीचे मंदीर सध्या बंद असल्यामुळे या रस्त्यावर भाविकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. रस्त्यातील दरड दुर करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे .