नाशिक Lalit Patil Case Update: एमडी ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेकडून शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी महापौरांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे होती. (Former Nashik Mayor Inquiry) मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याने गाडी रातोरात सात वर्षे जुनी दाखवली गेली. गॅरेज मालकाला प्रलोभन देत जुनी हिस्ट्री तयार केली गेली. कार जुनी वाटावी म्हणून गाडीचे चारही टायर बदलण्यात आलेत; मात्र पाच वर्षांपासून ललित पाटीलने गाडी दुरुस्तीचे बिल दिले नाही म्हणून गाडी पडून आहे असं गॅरेज मालकाचं म्हणणं आहे. त्यामुळे नाशिक पोलीस हे प्रकरण किती गांभीर्याने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Vinayak Pandey)
असा झाला ललित पाटीलचा शिवसेना प्रवेश:2014 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या मातोश्रीवर ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यावेळी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे, दादा भुसे उपस्थित होते. ललित पाटील प्रकरण समोर आल्यानंतर ललित पाटील याचा पक्ष प्रवेशाचा फोटो व्हायरल झाला आणि वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं होतं. मात्र, सन 2014 मध्ये पक्षात पदावर नव्हतो. अजय बोरस्ते महानगरप्रमुख होते. महानगरप्रमुखाच्या परवानगीशिवाय प्रवेश होत नसून त्यांनी केलेले पाप माझ्या माथी मारू नये. 2016 पासून माझा ललितसोबत कोणताही संबंध नाही. ललित आणि माझे कॉल रेकॉर्ड तपासावेत. मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. ललित पाटील याची कोणतीही कार माझ्याकडे नव्हती, असं माजी महापौर विनायक पांडे यांनी म्हटलं आहे.