नाशिक - शहराजवळील वील्लोळी गावात एका मजुराने कंपनी जवळील विद्युत डीपीवर चढून विजेच्या शॉकने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष कांबळे, असे या मजुराचे नाव आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने मृत संतोष कांबळे यांना खाली उतरविण्यात आले.
नाशिकच्या वील्लोळीत विद्युत डीपीवर चढून कामगाराची आत्महत्या - शॉकने
नाशिकच्या वील्लोळी गावात एका मजुराने कंपनी जवळील विद्युत डीपीवर चढून विजेच्या शॉकने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
वील्लोळीत विद्युत डीपीवर चढून कामगाराची आत्महत्या
या मृत्यूचे दृश्य पाहून अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला तर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या घटनेबाबत नाशिक तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.