महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे 'कुसुमाग्रज स्मरण गोदावरी गौरव २०२० पुरस्कार' जाहीर - kususmagraj smaran godavari gaurav 2020 award

१० मार्च २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता कालिदास कला मंदिर येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

kusumagraj trusts award declared nashik
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'कुसुमाग्रज स्मरण गोदावरी गौरव २०२० पुरस्कार' जाहीर

By

Published : Feb 3, 2020, 1:57 PM IST

नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'गोदा गौरव' पुरस्कारांची आज (सोमवारी) घोषणा करण्यात आली. पद्मश्री दर्शना जव्हेरी यांना नृत्यक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल या पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील ६ मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नृत्य, क्रिडा, शिल्प, क्रीडा यासह एकूण सहा क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो.

१० मार्च २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता कालिदास कला मंदिर येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तरी या सोहळ्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

'या' मान्यवरांचा होणार सन्मान -

  1. पद्मश्री दर्शना जव्हेरी (नृत्य)
  2. भगवान रामपुरे (शिल्प)
  3. श्री काका पवार (क्रीडा)
  4. श्रीगौरी सावंत (लोकसेवा)
  5. सई परांजपे ( चित्रपट)
  6. डॉ माधव गाडगीळ (विज्ञान)

हेही वाचा : 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून एकाला दीड कोटींना लुटणारी 'बंटी-बबली' जोडी ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details