नाशिक - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसायावर गदा आली आहे. मात्र, आजही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करण्याचा हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. याच आर्थिक विवंचनेतून एकाने येथील आयडीबीआय बँकेत जाऊन सहाय्यक व्यवस्थापक असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून 10 लाख रुपयांची मागणी केली.
धक्कादायक; आर्थिक विवंचनेतून बँकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या गळ्याला लावला चाकू - सरकार वाडा पोलीस ठाणे नाशिक
कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. यात काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात शासनाला यश आले आहे. तरी दुसरीकडे, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्या तर, काही व्यवसाय बंद पडले. त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न भेडसावत आहे.
कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. यात काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात शासनाला यश आले आहे. तरी दुसरीकडे, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्या तर, काही व्यवसाय बंद पडले. त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न भेडसावत आहे. याच आर्थिक विवंचनेतून शहरातील तारवाला नगर भागात राहणाऱ्या अशोक बोडके याने एमजी रोड भागातील आयडीबीआय बँकेत प्रवेश केला. यानंतर त्याने चक्क सहाय्यक व्यवस्थापक असलेल्या तृप्ती अग्रवाल यांच्या गळ्याला चाकू लावत 10 लाख रुपयांची मागणी केली. सुरुवातीला काय होत आहे, हे कोणालाच कळले नाही. मात्र, नतंर अग्रवाल यांचा ओरडण्याचा आवाज आल्यावर सर्वच हादरून गेले. बोडके लॉकडाऊनमुळे आपल्यावर आलेली परिस्थिती सांगून पैशांची मागणी करत होता.
बँक कर्मचारी यावेळी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तो ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. याच गडबडीत चाकूचा वार तृप्ती अग्रवाल यांच्या हाताला लागला. परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहून बँकेचे व्यवस्थापक प्रदीप चंदेल यांनी बोडकेशी बोलणी करत त्याला धीर दिला. यावर बोडकेचे समाधान झाल्यानंतर त्याने अग्रवाल यांची सुटका केली. त्यानंतर,काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी संशयित बोडकेला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सरकारवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणामुळे सद्य परिस्थितीतील भीषण वास्तव समोर आले आहे.