येवला (नाशिक) - मकरसंक्रात जवळ आली की येवलेकरांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. येवल्यात तीन दिवस पतंग उडविण्याची धूम असते. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या या सणाला पतंगांची तेवढीच मोठी मागणी असते. त्यामुळे येवल्यातील पतंग बनविणा-यांची लगबग सुरु असून विविध रंगांचे आकाराचे पतंग बनविण्यात कारागीर मग्न आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त पतंग व आसारी बनवण्याची लगबग - मकर संक्रात आणि येवला न्यूज
तब्बल २५० वर्षांची परंपरा असलेल्या पतंगोत्सवासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत. येथील नवी पिढीही अधिक हर्षोल्हासाने या परंपरेला साद घालत पुढे नेत आहे. यंदाही या महोत्सवासाठी पतंग, आसारी खरेदीची लगबग सुरू आहे.
मकर संक्रांतीनिमित्त पतंग व आसारी बनवण्याची लगबग