महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 14, 2019, 8:25 AM IST

Updated : Oct 14, 2019, 3:29 PM IST

ETV Bharat / state

नाशकातील तरुणाचा प्रचारासाठी अनोखा फंडा; 'स्पेशल बाईक'वरून करतोय प्रचार

किरण राजवाडे हा युवक चक्क आपल्या दुचाकीला राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे, बॅनर, त्याबरोबर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची पोस्टर आपल्या लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करत आहे.

स्पेशल बाईक

नाशिक- विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रत्येक राजकीय पक्ष विविध प्रकारे प्रचाराचे फंडे आजमावत आहेत. नाशिकमध्ये देखील एक असाच काहीसा फंडा पाहायला मिळत आहे.

नाशकातील तरुणाचा प्रचारासाठी अनोखा फंडा

हेही वाचा - कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी

किरण राजवाडे हा युवक चक्क आपल्या दुचाकीला राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे, बॅनर, त्याबरोबर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची पोस्टर लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करत आहे. राजवाडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.

हेही वाचा -डेंग्यू सदृश आजाराचा प्रादुर्भाव, नागरिकात भीती

राजवाडेंनी आपल्या पावणे तीन लाखाच्या दुचाकीचा वापर राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी केला आहे. राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता आणि पक्षावर असलेल्या प्रेमापोटी आपण ही संकल्पना राबवल्याचे किरण यांनी सांगितले.

Last Updated : Oct 14, 2019, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details