दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतातील कामांना वेग आला. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. कित्येक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून देखील घेतली आहे. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्यासारखे दिसत आहे.
तालुक्यातील पूर्व भागात दोन दिवसात पूर्ण पेरण्या उरकतील, असे दिसत आहे. तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन, मूग, भुईमूग, उडीद, तूर वरई भात ही पिके घेतली जातात. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांनी भुईमुग, सोयाबीन या पिकांना पसंती दिलेली दिसते. तरिही आता वरूणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरी द्विधा अवस्थेत अडकला आहे.
दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण... मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत हेही वाचा...शिर्डी : कोट्यवधीची उलाढाल.. तरीही साई मंदिरात काम करणारे कर्मचारी पगारापासून वंचित
दिंडोरी तालुक्याचा पाश्चिम पट्टा पूर्णतः पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे भाताचे रोप टाकण्यात येत असून भुईमुग लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मात्र, आता टॉमॅटो पीक कमी प्रमाण होऊन सोयाबीन आणि भुईमुग याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिंडोरी तालुक्यात बळीराजा खरीपाच्या पेरणीत दिंडोरी तालुका कृषी विभाग सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबिन आणि खताची माहिती उपलब्ध करून देत आहेत.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी वर्ग आपल्या गावातील कृषी सेवा केंद्र दुकानातून बी- बियाणे खरेदी करत आहेत. गर्दी न करता विशेष काळजी घेत आहे. तोंडाला रुमाल, मास्क वापरून दुकानात प्रवेश करत आहे. तसेच या वर्षी प्रत्येक जिल्हा परिषद गटात त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन घेऊन पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित जमदडे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना केले.