येवला(नाशिक) - मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर पेरणीला वेग आला आहे. येवला तालुक्यात सध्या खरीप पेरणीचे काम जोरात सुरू आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे .
येवला तालुक्यात बळीराजा खरीपाच्या पेरणीत व्यग्र - मॉन्सून २०२०
येवला तालुक्यात पेरणीला वेग आला आहे. मॉन्सूनचा पाऊस झाल्याने शेतकरी पेरण्या उरकत आहे. तालुक्यात खरीप हंगामात मका, कपाशी, बाजरी, मूग, भुईमूग, उडीद, तूर आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांनी मका, कांदा, सोयाबीन या पिकांना पसंती दिलेली दिसते.
तालुक्यातील पूर्व भागात दोन दिवसात पूर्ण पेरण्या उरकतील असे दिसत आहे. तालुक्यात खरीप हंगामात मका, कपाशी, बाजरी, मूग, भुईमूग, उडीद, तूर आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांनी मका, कांदा, सोयाबीन या पिकांना पसंती दिलेली दिसते. तालुक्याचा पूर्व भाग पूर्णतः पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे कपाशी लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मात्र, आता कपाशीचे कमी प्रमाण होऊन मका व कांदा याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
कृषी विभाग येवला सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून देत आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी वर्ग आपल्या गावातील कृषी सेवा केंद्र दुकानातून बी- बियाणे खरेदी करीत असून गर्दी न करता विशेष काळजी घेत आहे. तोंडाला रुमाल, मास्क वापरून दुकानात प्रवेश करत आहे.