नाशिक Jitendra Awadas: प्रभू राम हे मांसाहारी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर नाशिक मधील साधु महंत आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्याने समस्त हिंदूंच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिक मधील साधू महंतांनी केलीय. या अर्जावर पोलीस काय भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल : राम हे शाकाहारी नव्हते, तर मांसाहारी होते. त्यांनी 14 वर्षे वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत आयोजित दोन दिवसीय शिबीरात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे नाशिकमधील साधू महंतांमध्ये पडसाद उमटले. आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले ते असे, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते. प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यतित केला, हे अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. त्यामुळं यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी साधू महंतांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.