सटाणा (नाशिक) - संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहे. या लढाईत आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कामाला प्राधान्य देत आहेत. बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेची दखल घेत ग्रामपंचायत सदस्या छाया जगताप व गावातील अन्य महिलांनी त्यांचे औक्षण करीत पुष्पहार घालून सन्मान केला.
Corona: स्वच्छता कर्मचाऱ्यांचा फुलांची उधळण करत सन्मान, जायखेडा ग्रामस्थांचा उपक्रम - corona
सफाई कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेची दखल घेऊन जायखेडा येथील हनुमान चौकात ग्रामपंचायत सदस्या छाया जगताप यांच्यासह महिलांनी त्यांचा सन्मान केला.
सफाई कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेची दखल घेऊन जायखेडा येथील हनुमान चौकात ग्रामपंचायत सदस्या छाया जगताप यांच्यासह आशा अहिरे, सुनिता अहिरे, रोशनी अहिरे, शोभा जंगम, मनिषा अहिरे, मंगल गुरव, अरुणा जगताप, सोनाली अहिरे, सुमनबाई जगताप प्रियंका अहिरे आदी महिलांनी ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी पोपट जगताप व सागर सोळंकी यांच्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महिलांनी या दोघांचे औक्षण केले आणि पुष्पहार घालून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत त्यांच्या सेवेचा सन्मान केला.
हनुमान चौकात घंटागाडी येताच अनपेक्षितपणे झालेल्या या सत्काराने हे कर्मचारी भारावून गेले. यावेळी निंबा सोनवणे, नरेंद्र खैरनार, सागर अहिरे, स्वप्निल अहिरे, दादा जंगम, दिलीप गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.