महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर

जयंत नारळीकर
जयंत नारळीकर

By

Published : Jan 24, 2021, 4:17 PM IST

Updated : Jan 24, 2021, 5:15 PM IST

16:13 January 24

94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर

नाशिक

नाशिक - 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. शेवटच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू होती. साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चार तास बैठक चालली होती, त्यात नारळीकरांच्या नावावर एक मत झाले.

नारळीकर यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिर्ला सन्मान आणि फ्रेंच अ‌ॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले आहेत. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते अधिछात्र आहेत. विज्ञान अकादमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला. साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयाच्या पटांगणात २६ ते २८ मार्चला होणार आहे.

कोण आहेत जयंत नारळीकर? 

  • जन्मगाव - कोल्हापूर
  • जन्म - 19 जुलै 1938
  • खगोल भौतिक शास्त्रज्ज्ञ व सुप्रसिद्ध लेखक
  • केम्ब्रिज विद्यापीठ टाटा मूलभूत संशोधन संस्था हे त्यांची कार्यसंस्था

नारळीकर यांची गाजलेली पुस्तके 

  1. अंतराळातील भस्मासूर
  2. अंतराळ आणि विज्ञान
  3. गणितातील गमती जमती
  4. यशाची देणगी
  5. चार नगरातील माझे विश्व

जयंत नारळीकर यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार -

  • 1965 पद्मभूषण
  • 2004 पद्मविभूषण
  • 2010 महाराष्ट्र भूषण

अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कार                                                                                                                                                                                                                                                                                 जयंत नारळीकर यांनी लिहिलेली पुस्तके..

१)वामन परत न आला
२)अंतराळातील भस्मासूर
३)कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक फ्रेड हॉयल Fred Hoyle)
५)प्रेषित
६)व्हायरस
७)अभयारण्य
८)यक्षांची देणगी
९)टाइम मशीनची किमया
१०)याला जीवन ऐसे नाव

Last Updated : Jan 24, 2021, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details