महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनता कर्फ्यू : दिंडोरी तालुक्यात कडकडीत बंद, सप्तशृंगी गडावर शुकशुकाट - कोरोनाव्हायरस अपडेट

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात आज जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातून दोन राज्याला जोडला जाणारा गुजरात राष्ट्रीय महामार्ग हा ओस पडला असून ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांनीही जनता कर्फ्यूच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत घरीच बसणे पसंत केले आहे.

दिंडोरी तालुक्यात कडकडीत बंद, सप्तशृंगी गडावर शुकशुकाट
दिंडोरी तालुक्यात कडकडीत बंद, सप्तशृंगी गडावर शुकशुकाट

By

Published : Mar 22, 2020, 1:15 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला जिल्ह्यात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगी मातेच्या गडावरही शुकशुकाट दिसत आहे.

दिंडोरी तालुक्यात कडकडीत बंद, सप्तशृंगी गडावर शुकशुकाट

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात आज जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातून दोन राज्याला जोडला जाणारा गुजरात राष्ट्रीय महामार्ग हा ओस पडला असून ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांनीही जनता कर्फ्यूच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत घरीच बसणे पसंत केले आहे. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, वणी, खेडगाव, मोहाडी, ननाशी, भनवड, कोशिंबा, जानोरी या सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावामध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला आहे. तर, सप्तशृंगी देवीच्या गडावर परिसरातील ग्रामस्थांनी न जाण्याचा निर्णय घेतलामुळे सप्तशृंगी गडावरही शुकशुकाट दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details