महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या ग्रामीण भागात झाला ढगफुटी सारखा पाऊस - नाशिकच्या ग्रामिण भागात झाला ढगफुटी सारखा पाऊस

मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात काल जोरदार पाऊस झाला. चांदवड तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. या पडलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

नाशिकच्या ग्रामिण भागात झाला ढगफुटी सारखा पाऊस
नाशिकच्या ग्रामिण भागात झाला ढगफुटी सारखा पाऊस

By

Published : Jun 7, 2021, 12:52 PM IST

चांदवड- मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चांदवड तालुक्यातील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक शेतीमध्ये पाणी जमा झाले आहे. साधारण तासभर झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे.

नाशिकच्या ग्रामिण भागात झाला ढगफुटी सारखा पाऊस

शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात रविवारी देखील जोरदार पाऊस झाला. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीसह इतर भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला असल्याने, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. काही गावात पुराचे पाणी शिरले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. एक तासानंतर पावसाचा जोर कमी झाला. गेल्या काही दिवसांपासून सलग जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. पुढेही चांगला पाऊस होईल, या आशेवर बळीराजा आता मशागतीच्या कामाला लागला आहे. चांदवड तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.

बळीराजा सुखावला

गेल्या चार दिवसांपासून सलग पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक घेण्यासाठी मदत होणार आहे. असाच पाऊस पुढेही पडावा अशी आशा शेतकरी करत आहेत. या पडलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

हेही वाचा -यावर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही; महापालिकेने लढवली ही शक्कल

ABOUT THE AUTHOR

...view details