नाशिक- पुनद धरणातून सटाणा शहराला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भात परत न्यायालयात बाजू मांडून स्थगिती देण्याचा एकमुखी ठराव धरणक्षेत्रातील ४० खेडेगावातील नेत्यांनी केला आहे. ठेंगोडा येथे झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला आहे. पाणीपुरठा करण्यास स्थगिती न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ४० खेड्यातील शेतकरी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
नाशिक : पुनद पाणीप्रश्नी पेटला; न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा ४० गावांचा ठराव
सटाणा शहरात पाणी देण्यास विरोध नसून सदर पाणी पाईपलाईद्वारे नेण्याएवजी चारीने न्यावे या मुद्द्यावर ठाम राहत याबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी एक जुलैला पुनद येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जनआंदोलन उभे करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे तसेच या बैठकीत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनीही यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे देविदास पवार यांनी केले आहे.
सटाणा शहरात पाणी देण्यास विरोध नसून सदर पाणी पाईपलाईद्वारे नेण्याएवजी चारीने न्यावे या मुद्द्यावर ठाम राहत याबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी एक जुलैला पुनद येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जनआंदोलन उभे करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे तसेच या बैठकीत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनीही यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे देविदास पवार यांनी केले आहे. पुनद धरणातून ५५ कोटी रुपये खर्च करून पाईपलाईनने पाणी नेण्यापेक्षा शासनाने ठेंगोडा पाझर तलावातून पाणी नेले तर पाच ते सहा कोटी रुपयात सटाण्याचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले.
पुनद पाईपलाईनचा प्रश्न चर्चेतून काढू असे म्हणणारे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून गुपचूप कोर्टातून आदेश घेऊन आले. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून न्यायालयासमोर शेतकऱ्यांची बाजू मांडून सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी ४० गावातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांचा डाव हाणून पाडू, असा ठराव शेतकरी संघटनेतर्फे शांताराम जाधव यांनी मांडला. ५५ कोटीचा निधी खर्च करण्यासाठी पाईपलाईनचा घातलेला घाट कसा चुकीचा आहे, हे कोर्टात सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन लढाईसाठी लागणारा निधी गावातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभा करू, असे आवाहन केले आहे.