नाशिक - शहराच्या मध्यवर्ती भागातील गोदाम फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केले आहे. गुजरातमधून अटक करण्यात आलेल्या या टोळीकडून १०० हून अधिक टीव्ही, एसी असा ४१ लाखाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी जेरबंद, अवघ्या आठ दिवसांत केला तपास - nashik police arrested interstate gang
नाशिक पोलिसांनी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १०० हून अधिक एलईडी टीव्ही, एसी अशा मुद्देमाल या सह चोरीच्या घटणेसाठी वापरलेला ट्रक देखील जप्त केलाय. या टोळीकडून राज्यातील आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नाशिक शहरातील तिगरानीया रोड परिसरात असलेले मॅट्रिक डिस्ट्रीब्यूटर कंपनीचे गोदाम फोडून येथून लाखो रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करत या प्रकरणातील आरोपींना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून ४१ लाख रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेतला आहे. गुजरातच्या गोध्रा भागातून गजाआड करण्यात आलेल्या या आरोपींनी नाशिकच्या सिन्नर शहरातही टायरचे गोदाम फोडून लाखो रुपयांचे टायर चोरल्याची बाब या तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी या आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाला ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देखील जाहीर केले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी १०० हून अधिक एलईडी टीव्ही, एसी अशा मुद्देमाल या सह चोरीच्या घटणेसाठी वापरलेला ट्रक देखील जप्त केलाय. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे पथकातील आनंदा वाघ, महेश कुलकर्णी या अधिकाऱ्यांनी या तपासासाठी तब्बल ३ दिवस गुजरातमध्ये तळ ठोकत या आंतरराजीय टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीकडून राज्यातील आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.