नाशिक:नाशिकमध्ये शरणपूर परिसरात 1885 साली सेंट अंद्रिया चर्चची स्थापना झाली. (Andrews Church In Nashik) ही शहरातील सर्वात जुने चर्च आहे. काळा पाषाणात उभारलेली पुरातन आकर्षक वास्तू असून 130 वर्षात या इमारतीला धडा देखील गेला नसल्याने, (Andrews Church) चर्चच्या डाग डुगीचे काम ही करावे लागत नाही (130 year old Saint Andrews Church). 24 तास प्रार्थनेसाठी हे चर्च खुले असते. एका वेळेस चर्चमध्ये 500 लोकं प्रार्थना करू शकतील, अशी व्यवस्था या चर्चमध्ये आहे.
धार्मिक, अध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. अशातच नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात 1855 साली सेंट अंद्रिया चर्चची स्थापना झाली. या चर्चची वैशिष्ट्य म्हणजे, या चर्चची रचना अशी केली आहे की, चर्चवर कधीही वीज पडत नाही. तसेच आकाशातून चर्च बघितल्यास या चर्चला क्रॉसचा आकार देण्यात आला आहे. ख्रिस्ती बांधवांचे हे श्रद्धास्थान आहे. 5 हजार सदस्यांचे चर्चे असून या चर्चमध्ये शनिवार व रविवार नियमित प्रार्थना होते.
चर्चची रंजक कथा:सेंट आंद्रिया चर्चेची कथा देखील मोठी रंजक आहे. धर्मप्रचारक विल्यम फ्राइस हे घोड्यावरून प्रवास करत होते. शहरात हा घोडा जिथे थांबेल, तेथे चर्च उभाराचे असा निश्चय त्यांनी केला, अशात शरणपूर रोड परिसरातील जागेवर या घोड्याच्या पायाला दुखापत झाली. आणि घोडा तेथे थांबला हा ईश्वराचा संकेत असून तेथे हे चर्च उभारले गेले आहे. त्यावेळी या चर्चच्या कामाकरिता 25 हजार रुपयांच्या खर्च आला होत आहे.
सामजिक उपक्रम:या चर्च मधील सदस्यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांना अन्न तसेच शैक्षणिक मदत केली जाते. शिवाय वृक्षारोपण, रक्तदान शिबिर तसेच वर्षभरात नाताळसह विविध कार्यक्रम येथे होतात. 24 तास प्रार्थनेसाठी हे चर्च खुले असते. एका वेळेस चर्चमध्ये 500 लोकं प्रार्थना करू शकतील, अशी व्यवस्था या चर्चमध्ये आहे.
नाताळाची जय्यत तयारी:नाताळ सण अर्थात येशू खिस्ताचा जन्मोत्सव ख्रिस्ती बांधवामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणासाठी शहरातील सर्व चर्चमध्ये तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी चर्चच्या आवारात येशू जन्माच्या देखावा उभारण्याचे काम सुरू आहे. या निमित्ताने चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली असून परिसरात विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. तसेच चर्चच्या आवारातच दरवर्षीप्रमाणेच यंदाही गव्हाणीचा म्हणजे येशू ख्रिस्त जन्माचा देखावा साकारण्यात येत आहे. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री, जिंगलबेल, चांदण्या आदी लावून आकर्षक सजावट करण्यात येत आहे.