नाशिक :आंतरजातीय विवाह ( Intercaste marriage ) केलेल्या 324 जोडप्यांचे अनुदान रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वधर्म समभाव, जातीभाव जोपासला जावा यासाठी समाज कल्याण विभागाकडून ( Department of Social Welfare ) आंतरजातीय विभागांना प्रोत्साहन दिले जाते. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत म्हणून 50 हजाराच्या अनुदान देण्याची तरतूद आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून केंद्र व राज्य सरकारकडून पुरेस अनुदान मिळाले नाही.
सुमारे 454 जोडपी विवाहबद्ध होऊनही सरकारने अनुदान उपलब्ध करून दिले नाही. काही दिवसांपूर्वी त्यातूनही फक्त 130 जोडप्यांना मदत देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी शेकडो संख्येने आंतरजातीय विवाह केले जात असले तरी समाज कल्याणच्या या योजने विषयी अनेकांना माहिती नाही. त्या प्रमाणात लाभार्थी मिळत नसल्याचे वास्तव आहे.
अनुदानासाठी ही आहे अट :आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये वधू किंवा वर हा उच्च जातीय असण्याची अट आहे,एक जण अनुसूचित जाती जमातीतील असावा व एक जण उच्च वर्णीय असणे आवश्यक आहे, या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून एकत्रित पन्नास हजाराचा अनुदान दिले जाते आंतरजातीय विवाह प्रोत्साहन मिळावे हा हेतू असून अनुदानातून त्यांना आर्थिक हातभार लावला जातो..