महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'असंवेदनशील पालकमंत्री व परिवहन मंत्री आले आणि गेले'

पालकमंत्री भुजबळ आणि परिवहन मंत्री परब हेलिकॉप्टरने आले व फक्त रुग्णालयात गेले. ते ना घटनास्थळी गेले ना येसगाव येथील मृत कुटुंबाच्या घरी त्यांनी भेट दिली. त्यामुळे, ते आले आणि गेले, असेच म्हणावे लागेल, असे स्पष्ट मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

pravin derekar manmad
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण देरेकर

By

Published : Jan 29, 2020, 8:34 PM IST

नाशिक- विरोधी पक्षनेता म्हणून मी मुंबईवरून मनमाडला येणार असल्याची माहिती मिळताच पालकमंत्री भुजबळ आणि परिवहन मंत्री परब हे मनमाडला आले. मात्र, येथे देखील त्यांनी दुजाभाव करत मदत जाहीर केली. त्यामुळे ते आले आणि गेले असाच प्रकार आज बघायला मिळाला असून असंवेदनशील प्रकार आज सरकारकडून बघायला मिळाला आहे. याबाबत आगामी अधिवेशनात आवाज उठवून सर्वांना सारखी मदत देण्यास सरकारला भाग पाडू, असे स्पष्ट मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण देरेकर

काल अ‌ॅपे रिक्षा आणि एसटी बसला झालेल्या अपघातात २६ जण मृत्युमुखी झाले. या दुर्दैवी घटनेतील मृत्यू पावलेल्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे प्रत्येकी १० लाखाची मदत तर जखमींना ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली. तर अ‌ॅपे रिक्षामधील एकाच घरातील मुस्लिम कुटुंबाला फक्त २ लाख तर चालकाल २ लाख अशी तुटपुंज्या स्वरूपात मदत जाहीर केली आहे. मुळात पालकमंत्री भुजबळ आणि परिवहन मंत्री परब हेलिकॉप्टरने आले व फक्त रुग्णालयात गेले. ते ना घटनास्थळी गेले ना येसगाव येथील मृत कुटुंबाच्या घरी त्यांनी भेट दिली. त्यामुळे, ते आले आणि गेले, असेच म्हणावे लागेल. एरवी मुस्लिमांचा कणवळा असणाऱ्यानी असा दुजाभाव करणे योग्य नाही. रिक्षा आणि बसमधील मृत्युमुखी पडलेले दोनीही याच धर्तीवरील माणसे आहेत. त्यामुळे, दोघांनाही सारखी मदत करावी, असे आवाहन दरेकर यांनी केले. दरेकर यांनी अपघातस्थळी त्यानंतर जखमींना मालेगाव चांदवड त्यानंतर मुस्लिम कुटुंबाच्या येसगाव या ठिकाणी त्यांनी आज भेट दिली व मृतकांच्या परिजनांचे सांत्वन केले.

मुळात पालकमंत्री आणि परिवहन मंत्री दोघेही येणार नव्हते. जेव्हा मी ठाण्याच्या पुढे आलो तेव्हा ते खडबडून जागे झाले. आणि तात्काळ हेलिकॉप्टरने ते फक्त मालेगाव येथील जिल्हा रुग्णालयात आले. येथे ते जखमींना भेटले व आमचे निवेदन स्वीकारून लगेच परत निघून गेले. आम्ही त्यांना रिक्षाचालक व त्यातील मुस्लिम कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये व परिवारातील एकाला परिवहन खात्यात नोकरी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्वरित मदत केली नाही तर येत्या अधिवेशनात याबाबत जोरदार मागणी करून त्यांना तात्काळ मदत मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेरही होते. यावेळी त्यांनी एकाच कुटुंबातील ७ जण मृत पावलेल्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

हेही वाचा-नाशिक बस दुर्घटना : 26 जणांचा मृत्यू.. शेतकरी धावले होते मदतीला

ABOUT THE AUTHOR

...view details