नाशिक- राष्ट्रवादी पक्ष आणि पवार साहेब यांच्यावर नाराज होऊन कोणी पक्ष सोडून बाहेर जात नसून केवळ ईडी,सीबीआई चौकशी, बँकेची अडचण, कारखाने यामुळे राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून जात असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे ह्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत त्यावेळी त्या बोलत होत्या.
शरद पवारांवर नाराज होऊन नाही, तर 'या' कारणांमुळे नेते पक्ष सोडत आहेत - सुप्रिया सुळे - chagan bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या मोठी पडझड सुरु असून अशा कठीण काळात आपली माणसे सोडून गेले की वाईट वाटते. कारण मोठ्या मेहनतीने ही संघटना उभी राहिली आहे. आम्ही फक्त पक्ष म्हणून काम करत नाही, तर एक कुटुंब म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहोत.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून जाणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी सागितले की, प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या मोठी पडझड सुरु असून अशा कठीण काळात आपली माणसे सोडून गेले की वाईट वाटते. कारण मोठ्या मेहनतीने ही संघटना उभी राहिली आहे. आम्ही फक्त पक्ष म्हणून काम करत नाही, तर एक कुटुंब म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहोत. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले निर्णय घ्यायचे अधिकार आहेत. दबावतंत्र वगैरे अशा गोष्टी आमच्या तत्वात बसत नाहीत. त्यामुळे कुणी पक्ष सोडून जात असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही. पक्ष सोडून गेलेल्या प्रत्येकाने माझ्या वडिलांच्या आयुष्यात त्यांना साथ दिली आहे, याची जाणीव मला नेहमी राहील. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आदर आणि शुभेच्छाच असतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.