नाशिक - हैदराबाद येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर महिलाांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या भरवशावर न बसता आपणही संकटात असलेल्या महिलांना मदत करू शकतो, हे नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांनी दाखवून दिले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांचा अभिनव उपक्रम - Laxmikant Belmahale innovative initiative for women's safety
हैदराबाद येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर महिलाांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या भरवशावर न बसता आपणही संकटात असलेल्या महिलांना मदत करू शकतो, हे नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांनी दाखवून दिले आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांचा अभिनव उपक्रम
महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिकच्या लक्ष्मीकांत बेलमहाले यांचा अभिनव उपक्रम
हेही वाचा -दिंडोरीत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नगरसेवकानी पाठवली १ हजार पत्रे
दिंडोरी रोडवर लक्ष्मीकांत यांचे साई ऑटो सर्व्हिस स्टेशन आहे. त्यांनी संकटात असलेल्या महिलांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. एखाद्या महिलेची गाडी अचानक पंक्चर झाली किंवा बंद पडली तर लक्ष्मीकांत स्वतः त्या ठिकाणी जाऊन पंक्चर काढून देतात. तसेच त्या महिलेने घरी सोडण्याची मागणी केली तर ती पण मदत करतात. त्यामुळे लक्ष्मीकांत यांनी सुरू केलेल्या अनोख्या उपक्रमाचे नाशिककर भरभरून कौतुक करत आहेत.