महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sahitya Sammelan 2021 : संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक - Renaissance State Book

Girish Kuber
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेक

By

Published : Dec 5, 2021, 2:52 PM IST

Updated : Dec 5, 2021, 3:43 PM IST

14:45 December 05

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेक

नाशिक -ज्येष्ठपत्रकारगिरीश कुबेर यांच्यावर (Girish Kuber) आज साहित्य संमेलन परिसरात संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी शाई फेकली. संमेलनाच्या मुख्य मंचाच्या मागे ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला आहे.

कार्यक्रमठिकाणी जात असताना कुबेरांवर शाईफेक -

आज दुपारी गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण अशा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी जात असताना कुबेर यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला. या घटनेत एका पोलिसाचा गणवेश शाईने खराब झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ (Renaissance State Book) या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल अनेक राजकीय पक्षांनी तसेच विविध संघटनांनी विचारला गेला होता. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. यामुळेच शाईफेक झाली असावी, असा कयास लावला जात असून परिसरातदेखील याबाबत चर्चा आहे.

हेही वाचा -Omicron In Maharashtra : शारजाहवरून आलेल्या 95 प्रवाशांची नागपूर विमानतळावर कोरोना चाचणी

Last Updated : Dec 5, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details