नाशिक -भाजप पक्षात काही प्रमाणात बहुजन नेत्यांवर अन्याय होतं असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. मुंबई येथे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी नाशिकला येऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या. यावेळी खडसे यांचे छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार स्वागत करण्यात आले.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन
खडसेंचे नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून स्वागत
मुबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे जळगावकडे जाताना त्यांचे ठिकठिकाणी राष्ट्रवादी पदाधिकारी आणि खडसे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनेक भाजपचे आमदार माझ्या संपर्कात असून, ते देखील राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. मात्र, पक्ष बंदी कायद्यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे राहील, असेही खडसे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागत झाली असून, ते लवकरच यातून बरें व्हावे, अशा शुभेच्छा खडसे यांनी फडणवीस यांना दिल्या आहे.