नाशिक- लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली. त्यामुळे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ निर्माण झाला. अपक्ष उमेदवार शत्रुघ्न झोंबाडे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांची अनामत रक्कम भरून घेण्यास विलंब झाल्याने वाद झाला. त्यामुळे अपक्ष उमेदवाराचा अर्ज नाकारल्याने उमेदवारानी थेट जिल्हाधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी दिली.
अनामत रक्कमेवरून अपक्ष अर्ज नाकारला, उमेदवाराची नाशिक जिल्हाधिकाऱ्याला आत्महत्येची धमकी
मित्राजवळ अनामत रक्कम असल्याने शत्रुघ्न झोंबाडे यांना अनामत रक्कम भरता आली नाही. धुमाळ यांच्या मित्राला आत न घेतल्याने झोंबाड यांनी आपण आत्महत्या करू अशी धमकी दिली.
दिलेल्या वेळेत अनामत रक्कम न भरलेल्या अपक्ष उमेदवार शत्रुघ्न झोंबाड यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. शत्रुघ्न झोंबाडे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुरज मांढरे यांच्या दालनात गेले. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना त्यांचा मित्र पाणी पिण्यासाठी गेला. मात्र, तो परत आल्यानंतर त्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आतमध्ये येण्यास नकार दिला. त्याच मित्राजवळ अनामत रक्कम असल्याने शत्रुघ्न झोंबाडे यांना अनामत रक्कम भरता आली नाही. धुमाळ यांच्या मित्राला आत न घेतल्याने झोंबाड यांनी आपण आत्महत्या करू अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर झोंबाडे यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनातून बाहेर काढण्यात आले