महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक; कोरोनाचे नियम न पाळल्याने रुग्णसंख्येत वाढ - nashik corona news

जानेवारीमध्ये करोना रुग्ण संख्येत घट झाली होती. आता बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. इतर शहरांमधील रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे बंधन येऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे अनिवार्य आहे.

कोरोनाचे नियम न पाळल्याने रुग्णसंख्येत वाढ
कोरोनाचे नियम न पाळल्याने रुग्णसंख्येत वाढ

By

Published : Feb 16, 2021, 6:39 PM IST

Updated : Feb 16, 2021, 6:52 PM IST

नाशिक:-करोना विषाणूचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असतानाच आता अचानक शहरांमध्ये शाळा महाविद्यालय आणि इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात आले. परिणामी कोरोना रुग्णांची संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनही या वाढत्या कोरोनामुळे चिंतेत असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

कोरोनाचे नियम न पाळल्याने रुग्णसंख्येत वाढ

शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यामुळे रुग्णांमध्ये वाढ
जानेवारीमध्ये करोना रुग्ण संख्येत घट झाली होती. आता बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. इतर शहरांमधील रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे बंधन येऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या स्वॅब तपासणीतील पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण २८ टक्के तर शासकीय लॅबमधील पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण ५ टक्के येत असल्याने याबाबत प्रशासनामार्फत पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या आहेत.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करने गरजेचे आहे. शासकीय व खासगी लॅबमधील स्वॅब तपासणी अहवालांचे तुलनात्मक विश्लेषण करून कोरोना परिस्थितीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

१ हजार २३४ पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक ग्रामीण भागात ८१७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १७६, तर जिल्हा बाहेरील ५४ अशा एकूण २ हजार ७३ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर १ लाख १८ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १५ हजार ०४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २३४ पॉझिटिव्ह रुग्ण असून जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.


नाशिक ग्रामीणमध्ये सध्या उपचार घेत असलेले रूग्णसंख्या

नाशिक तालुका:- ३८, चांदवड १६, सिन्नर ५३, दिंडोरी २४, निफाड ८३, देवळा १८, नांदगांव ४३, येवला ३७, त्र्यंबकेश्वर २६, सुरगाणा ०९, पेठ ०२, कळवण १४, बागलाण २५, इगतपुरी १३, मालेगांव ग्रामीण ३१ असे एकूण ४३२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६१६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १७० तर जिल्ह्याबाहेरील १६ असे एकूण १ हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख १८ हजार ३५३ रुग्ण आढळून आले आहेत.

Last Updated : Feb 16, 2021, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details