महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार : नाशिकमधील गिरणारे केंद्रावर उडाला गोंधळ - Health Department Recruitment Examination

आरोग्य विभाग भरती परिक्षा राज्यस्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गासाठी घेण्यात आल्या आहे. नाशिक परिमंडळात गट-क मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परिक्षा दिली असून तिन्ही जिल्हयातील एकुण १४२ परिक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. नाशिक जिल्हा प्रथम सत्रात १८ हजार ०८७, व्दितीय सत्रात १८ हजार १८३ उमेदवार परीक्षा घेण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात द्वितीय सत्रात १४ हजार ७४८ तर अहमदनगर जिल्ह्यात दितीय सत्रात १७ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

By

Published : Oct 24, 2021, 12:49 PM IST

नाशिक - आरोग्य विभागाच्या परिक्षेतील भोंगळ कारभार थांबायचे नाव घेत नसून नाशिक मधील गिरणारे केंद्रावर गोंधळ उडाला होता. परिक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थी संख्येच्या तुलनेत कमी पेपर मिळाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्याविरोधात परिक्षार्थींनी मुर्दाबादच्या घोषणा देत संताप व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये आज नाशिक मधील गिरणारे केंद्रावर मोठ्या प्रमाणावर ती प्रश्नपत्रिकांचा तुटवडा भासला मुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले परंतु अधिकारी देखील या ठिकाणी हतबल झाले आहे.

नाशिकमधील गिरणारे केंद्रावर उडाला गोंधळ

केंद्रावर पेपर आणणाऱ्या तरुणांकडे आईडी कार्ड देखील नव्हते -

आरोग्य विभागाच्या वतीने आज राज्यभरात विविध केंद्रांवर परिक्षा घेतली जात आहे. दोन आठवड्यांपुर्वी भोंगळ कारभारामुळे नियोजीत परिक्षा रद्द करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढावली होती. मात्र आज देखील अनेक परिक्षा केंद्रावर नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. गिरणारे परिक्षा केंद्रावर हीच परिस्थिती पहायला मिळाली.पेपर कमी आल्याने गिरणारे केंद्रावर गोंधळ उडाला.पेपर केंद्रावर आणताना काळजी घेण्यात आली नाही असा आरोप विध्यार्थ्यांनी केला आहे.केंद्रावर पेपर आणणाऱ्या तरुणांकडे आईडी कार्ड देखील नव्हते असा अरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे पेपर प्रक्रिया राबवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रश्नपत्रिकेचे संचही अपुरे -

आरोग्य विभागाच्या वतीने आज रविवारी भरती पेपर आयोजित केला होता यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण नियोजन केल्याचा दावा केला होता परंतु हा दावा नाशिक मध्ये पूर्णपणे फेल ठरल्याचे समोर आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की आरोग्य विभागाच्या वतीने भरती प्रक्रियेसाठी आयोजित केलेले प्रश्नपत्रिका संच हे काल रात्रीपासूनच वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पोचवण्याचे काम सुरू होते त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत आणि त्या पथकांच्या माध्यमातून ही सर्व प्रश्नपत्रिका संच रवाना करण्यात आली परंतु नाशिक शहरापासून जवळच असलेल्या गिरणारे येथील परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचा संच हे अपुरे आले आणि विद्यार्थ्यांची संख्याही जास्त होती त्यामुळे या ठिकाणी वेळ होऊन ही प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली प्रथम दर्शनी या कर्मचाऱ्यांनी प्रश्नपत्रिका येत असल्याचे सांगितले. परंतु नंतर आरोग्य विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रश्नपत्रिका कमी आल्याचे सांगितले त्यावरून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आरोग्य विभागाचे अधिकारी ज्या गाडीतून आले ते त्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला परंतु आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांकडे याबाबत कोणतेही योग्य उत्तर नसल्याकारणाने संतप्त विद्यार्थ्यांच्या जमावासमोर कोणतेही उत्तर देऊ शकत नाही, अधिकारी विद्यार्थ्यांना कुठलेही उत्तर न देता निघून गेल्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाल्याचे ग्रामीण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे.

142 परीक्षा केंद्र -

सदरील भरती परिक्षा राज्यस्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गासाठी घेण्यात आल्या आहे. नाशिक परिमंडळात गट-क मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परिक्षा दिली असून तिन्ही जिल्हयातील एकुण १४२ परिक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. नाशिक जिल्हा प्रथम सत्रात १८ हजार ०८७, व्दितीय सत्रात १८ हजार १८३ उमेदवार परीक्षा घेण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात द्वितीय सत्रात १४ हजार ७४८ तर अहमदनगर जिल्ह्यात दितीय सत्रात १७ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details