महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी - नाशिक बातमी

आयकर विभागाचे विशेष पथक आज सकाळी 11 वाजता  लासलगाव येथील 4 मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे एकाच वेळी दाखल झाले. कांद्याच्या चाळ्यांवर चौकशी सुरू होती. त्याच वेळी बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव सुरु होता. दरम्यान यावेळी कांद्यांच्या दरात 150 ते 200 रुपयांनी घसरण झाली.

कांदा

By

Published : Nov 11, 2019, 5:27 PM IST

नाशिक- आशिया खंडातील मुख्य कांदा मार्केट लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीतील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. आज सकाळी साडेअकारा वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाच्या विशेष पथकाने लासलगाव येथील 4 मोठ्या कांदा व्यापाऱ्यांची तपासणी केली. त्यामुळे आता कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

नाशकात कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी

हेही वाचा - कांदा व्यापारी केंद्रीय अन्न, औषध विभागाच्या रडारवर; नाशकात तपासणी सुरू

आज सकाळी 11 वाजता आयकर विभागाचे विशेष पथक लासलगाव येथील 4 मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे एकाच वेळी दाखल झाले. कांद्याच्या चाळयांवर चौकशी सुरू होती. त्याच वेळी बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव सुरु होता. दरम्यान यावेळी कांद्यांच्या दरात 150 ते 200 रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कांद्याचे दर आणखी कोसळण्याची चिंता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details