महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या आंदोलनाला विरोध करत नाशिकमध्ये काँग्रेसकडून भाजपचा निषेध - महाराष्ट्र बचाव भाजप आंदोलन

कोरोना महामारीच्या संकटात राज्यातील जनतेला सेवा आणि मदत करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका भाजपने ठेवला. मात्र, भाजपच्या आंदोलनाला विरोध करत नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा निषेध व्यक्त केला.

inc protest
भाजपच्या आंदोलनाला विरोध करत नाशिकमध्ये काँग्रेसकडून भाजपचा निषेध

By

Published : May 22, 2020, 9:04 PM IST

नाशिक -भाजपने आज राज्यभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कोरोनाशी लढण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आंदोलन केले. तसेच कोरोना महामारीच्या संकटात राज्यातील जनतेला सेवा आणि मदत करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका भाजपने ठेवला. मात्र, भाजपच्या आंदोलनाला विरोध करत नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा निषेध व्यक्त केला.

आकाश छाजेड , काँग्रेस पदाधिकारी

मागील वर्षी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या संकटात भाजप सरकार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीने कोणतेही आंदोलन केले नाही. याउलट सरकारला मदतच केली. मात्र, भाजप आज गलिच्छ राजकारण आणि आंदोलन करत असल्याचे सांगत काँग्रेसकडून भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details