नाशिक - लहवीत रेल्वे स्थानकाजवळ भरधाव रेल्वेच्या धडकेत एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली. रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात झाला आहे. अपघातातील मृत बिबट्या साडेतीन ते चार वर्ष वयाचा असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. मुंबईकडे धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पोल क्रमांक १७२/२६ व २८ मध्ये कोणीतरी गाडी धडकली असल्याची माहिती मालगाडीच्या ड्रायव्हरने स्टेशनमास्तर अदित्य कुमार यांना कळविली होती.
नाशिकच्या लहवीत परिसरात रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच्या रविवारी पहाटे एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. हा तोच बिबट्या आहे का याचा शोध सुरू होता, त्यातच निफाड जवळ एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.
स्टेशनमास्टर यांनी तत्काळ तेथील गँगमन असलेले प्रवीण गायकवाड यांना घटनेची माहिती घेण्यास सांगितले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन बघितले तर बिबट्याचे शीर धडावेगळे झाल्याचे दिसून आले. त्यांननंतर त्यांनी सविस्तर घटनेची माहिती वनविभाला कळविली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास वनाधिकारी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याला नाशिकला नेले. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यावर अंत्यसंस्कार केले.
काही दिवसांपूर्वीच्या रविवारी पहाटे एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. हा तोच बिबट्या आहे का याचा शोध सुरू होता, त्यातच निफाड जवळ एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.