महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये फ्री शिप नाकारण्याविरोधात अभाविपचे आंदोलन

राज्यातील चार कृषी विद्यापीठे व अन्य विद्यापीठांमार्फत दिले जाणारे कृषी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत दिल्या जाणाऱ्या स्काॅलरशीपच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे. याचा निषेध करत अभाविपने नाशिकच्या समाज कल्याण कार्यलयात आंदोलन केले.

By

Published : Jul 7, 2019, 11:50 AM IST

अभाविप प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करताना


नाशिक- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज नाशिकच्या समाज कल्याण कार्यलयात आंदोलन करण्यात आले. राज्यातील चार कृषी विद्यापीठे व अन्य विद्यापीठांमार्फत दिल्या जाणाऱ्या कृषी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशीपच्या नियमावलित बदल करण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आले.

राज्यातील चार कृषी विद्यापीठे व अन्य विद्यापीठांमधील दिले जाणारे प्रवेश कॅप राऊंड संपल्यानंतर SPOT Round मार्फत दिले जातात. हादेखील विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेचा एक भाग आहे. परंतु अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माण शास्त्र, अशा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना फ्री-शिपही नाकारण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नव्या नियमावलीमुळे ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती अशा प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरण्याची नामुष्की आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षांमध्ये फ्री-शिप मिळाली आहे तीदेखील त्यांना आता परत करावी लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सर्व वर्षांची संपूर्ण फी भरावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या विषयात अभाविपने प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे निवेदन दिले होते. परंतु त्यानंतर १० दिवस उलटून गेल्यानंतरदेखील शासनातर्फे या विषयामध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अभाविपने प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला.

संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत समाजकल्याण कार्यालय याविषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच राज्य शासनाचा वारंवार पाठपुरावा करेल व लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आहे. यानंतर अभाविपतर्फे हे आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले. परंतु जोपर्यंत विद्यार्थी हिताचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषद हे आंदोलन सुरूच ठेवेल, असा इशारादेखील देण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नाशिक जिल्हा संयोजक सागर शेलार, नगर सहमंत्री अथर्व कुलकर्णी, राकेश साळुंके, नितीन पाटील, केतन पाराशरे, शुभम पाटील, ऐश्वर्या पाटील, नितीन पाटील, श्रीप्रसाद कानडे, साईराज शिंदे, श्रेया सहाने, स्वराज पाटील आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details