नाशिक- जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असून रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख बघता आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सीजन सिलेंडरची कमतरता भासू नये. यासाठी जिल्हाप्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्याला वैद्यकीय कारणांसाठी १९२५ जम्बो सिलिंडर इतका पुरवठा होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे सद्यस्थितीत ११ हजार सिलिंडरची उपलब्धता करण्यात आली आहे.
..तर रुग्णांचीही संख्या वाढण्याची दाट शक्यता
जानेवारीपर्यंत अटोक्यात आलेल्या कोरोना संकटाने पुन्हा डोकेवर काढले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पाच दिवसापासुन अडीच हजार रुग्णांची भर पडली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. चिंतेची बाब म्हणजे ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरवरील रुग्णांचीही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री भुजबळ यांनी मागील आठवडयात बैठक घेत कोव्हिड सेंटर, व्हेंटिलेटर व आँक्सिजन पुरवरठा व्यवस्था पूर्ण क्षमतेने उभी करा, असे आदेश दिले होते. त्याचीच पूर्वतयारी म्हणून आता ऑक्सीजनची निर्मिती आणि उपलब्धता याची सांगड घातली जात आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १६ पुरवठादारांकडून ऑक्सीजन