दिंडोरी (नाशिक) -वणी ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते करण्यात आली.यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या २५ ऑक्सिजन बेडयुक्त कोविड सेंटरची पूर्ण तयारी झाली होती. परंतु ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे ही यंत्रणा सुरू करण्यात आली नव्हती.ऑक्सिजन पुरवठा सुरू झाल्याने ही यंत्रणा आत पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
नाशिक : दिंडोरीतील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणा कार्यन्वित - दिंडोरी ग्रामीण रूग्णालय
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहेत. अशावेळी २५ ऑक्सिजन बेड सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रामा केअर व रुग्णालयात ५५ बेडची पुरेपूर व्यवस्था झाली आहे. वणी परिसरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना मोठा दिला मिळणार आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात एकूण ६० बेडची मान्यता असून त्यापैकी ५५ बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहेत. अशावेळी २५ ऑक्सिजन बेड सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण सेंटर असल्याने कोणत्याच आरोग्य सेवा अपुऱ्या पडणार नाही,अशी ग्वाही नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. तसेच अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राजेंद्र बागुल व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचेही यावेळी झिरवाळ यांनी कौतुक केले.