नाशिक - सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावातील गणपतीच्या मंदिराबाहेर उभी केलेल्या एक्टिवा गाडीच्या डिकीत ठेवलेले साडेतीन लाख रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी घडली. चोरट्यांनी पाळत ठेवून ही रक्कम लांबविल्याचा अंदाज आहे. ही रक्कम चोरी करतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. या प्रकरणी नाशिकच्या सटाणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने या घटनेचा तपास करत आहे.
अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरातून साडेतीन लाख रुपये लांबविले, घटना सीसीटीव्हीत कैद - देवळा
सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावाच्या गणपती मंदिराबाहेरून एक्टिवा गाडीच्या डिकीत ठेवलेले साडेतीन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले. ही प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सुनील महाजन आणि प्रकाश मगर या दोघांनी देवळा तालुक्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेतून साडेतीन लाख रुपयांची रक्कम काढून आपल्या एक्टिवा गाडीच्या डिकीत ठेवली. ही रक्कम घेऊन जाताना ते ठेंगोडा गावातील प्रसिद्ध गणपती मंदिर येथे दर्शनासाठी थांबले. गाडी बाहेर पार्किंगला लावली असता गाडीच्या डिकीत ठेवलेली साडेतीन लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे दोघेही मित्र घरी गेल्यानंतर गाडीची डिकी उघडून बघितल्यावर त्यांना आपली रक्कम चोरी झाल्याचे कळले. यानंतर त्यांनी लगेच सटाणा पोलीस ठाण्यात या याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे.