महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beating Agricultural Laborers Nashik : नाशिकमध्ये मजुरीसाठी दुसऱ्या गावात गेले म्हणून शेतमजुरांना मारहाण, टाकला बहिष्कार

गावातील शेतमजुरांनी गावातच कामं करावी, बाहेर गावात जाऊ नये ( Labor Banned Working Other Village ) असा फतवाच नाशिक जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचातीने काढलाय. दुसऱ्या गावात मजुरीसाठी जाणाऱ्या शेतमजुरांना मारहाण ( Beating Agricultural Laborers Nashik ) करण्यात आली. त्यांच्यावर बहिष्कारही टाकला ( Boycott On Agricultural Laborers ). आता सामाजिक संघटनांच्या दबावामुळे ग्रामपंचायतीला माफीनामा काढत हा वादग्रस्त ठराव मागे घ्यावा लागलाय.

नाशिकमध्ये मजुरीसाठी दुसऱ्या गावात गेले म्हणून शेतमजुरांना मारहाण, टाकला बहिष्कार
नाशिकमध्ये मजुरीसाठी दुसऱ्या गावात गेले म्हणून शेतमजुरांना मारहाण, टाकला बहिष्कार

By

Published : Dec 28, 2021, 8:05 PM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील तळवाडे ग्रामपंचायतीने अजब फतवा ( Talwade Gram Panchayat Edict ) काढला होता. अवघ्या काही तासांत त्यांना माफी मागण्याची वेळ आली असतांना नाशिकच्या सटाणा तालुक्यात मजुरांना बाहेरगावी मजुरी करण्यासाठी जातात म्हणून, बेदम मारहाण करण्याची घटना ( Beating Agricultural Laborers Nashik ) घडलीय. सूरुवातीला गावात शेतीच्या कामास मजूर भेटत नाही म्हणून गावच्या पुढाऱ्यांना पंचायतीचा ठराव करत, गावाबाहेर मजुरीसाठी जाता येणार नाही ( Labor Banned Working Other Village ) असा फतवा काढला. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कारवाईचे आदेश काढले. लागलीच गावकऱ्यांनी ठराव मागे घेत माफीनामा जाहीर केला. ही सगळी घटना ताजी असतांना सटाण्यात मजुरांना बाहेर गावी जाता म्हणून, बेदम मारहाण घडल्याची खळबळजनक घटना घडलीय.

नाशिकमध्ये मजुरीसाठी दुसऱ्या गावात गेले म्हणून शेतमजुरांना मारहाण, टाकला बहिष्कार

लखमापुरात मजुरांना मारहाण; तक्रार दाखल

सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे काही महिला मजूर शेजारच्या गावी मजुरीसाठी जात असतांना गावातील काही शेतकऱ्यांनी तसेत गावकऱ्यांनी वाहन चालकाला जबर मारहाण केली. याबाबत पीडित महिलांनी सटाणा पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. मालेगावातील तळवाडे येथे मजुरांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रसार माध्यमांच्या प्रयत्नाने हा ठराव मागे घेतला गेला. परंतु हे लोण ग्रामीण भागात झपाट्याने पसरत आहे. सध्या कांदे लागवडीची घाई असल्याने मजुर मिळत नाही म्हणून स्थानिक मजुरांना इतर गावात मजुरीसाठी जाण्यास बंदी घालण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढत चालले आहेत. रेखा चिंतामण पिंपळसे (वय २५, रा. कारगिल वस्ती, लखमापूर, ता. सटाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या १७ डिसेंबर राेजी गावातून वस्तीतील मजूरांसह मजुरीसाठी दहिवड गावी पिकअपमध्ये जात होत्या. त्यावेळी संशयित संजय पंडीत देवरे याने पिकअपला निर्वाळा रस्ता येथे अडवले. दादाजी दशरथ देवरे, चेतन संजय बच्छाव, ताराचंद पंडीत देवरे, राहुल नाराचंद देवरे, दत्तू, महारु गांगुर्डे, सोपान धामणे, सचिन ताराचंद देवरे, नंदू नानाजी कदम, मोठाभाऊ नामदेव आहिर, प्रविण कृष्णा देवरे हे मोटारसायकलवर तेथे आले. त्यांनी पिकअप गाडी लखमापूर पंचायत येथे फिरवा नाहीतर गाडी मजुरांसह पेटवून देऊ, अशी धमकी दिली. पिकअपचा ड्रायव्हर संदीप शांताराम माळी हा घाबरला. त्याने गाडी पंचायत कार्यालयात आणली. त्यानंतर वरील संशयितांनी पिकअपमधील लहान मुले- बाळे व इतर बायकांचे कपडे ओढून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. लहान मुले- मुली, बायका यांना हाताने व पायाने मारहाण करून त्यांचे अंगावरील कपडे ओढाताणीत फाडले. तसेच मजुरीचे मिळालेले ३७ हजार ५०० रुपये कोणी तरी चाेरुन नेले. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गावाबाहेर कामाला जाणाऱ्या शेतमजुरांवर थेट बहिष्कार

सध्या रब्बी हंगामाच्या कामाची धूम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमजुरांची टंचाई भासत आहे. गावातील मजुरांनी गावातच कामे करावी यासाठी मजुरांसाठीचा दर ठरविला जातोय. प्रत्येक गावात मजुरीचे दर वेगळे जरी असले तरी, या मजुरांना जेथे जास्तीचा रोजगार मिळतो त्या गावात मजुरीसाठी जाण्याचा कल अधिक असतो. बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांना गावातील कामे करता यावी यासाठी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळे ठराव केले जात जात आहेत. मालेगावच्या तळवाडे ग्रामपंचायतीनेही अजब ठराव केला आहे. गावाबाहेर कामाला जाणाऱ्या शेतमजुरांवर थेट बहिष्कार टाकण्याचा फतवाच ग्रामपंचायतीने अधिकृत पत्र काढून (Boycott On Agricultural Laborers ) केला आहे.

११ हजार रुपये दंड करण्याचा ठराव

विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्या मजुरांना गावातील व्यावसायिकांनी किराणा देऊ नये, दळण दळून देऊ नये यासह रेशनही न देण्याचा ठराव केला आहे. इतकेच नाही तर गावातून मजूर घेऊन जाणाऱ्या व बाहेरून मजूर घेऊन येणाऱ्यावर ११ हजार रुपये दंड करण्याचा ठराव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावाचे हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तर केवळ धाक दाखविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेतकरी व शेतमजुरांना सर्वाना मान्य असल्याचा खुलासा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने केलाय.

ग्रामपंचायतीचा ठराव मागे घेऊन माफीनामा

दरम्यान समाजमाध्यमांवर ठरावाची प्रत व्हायरल झाल्यावर अनेक समाजसेवकांनी विरोध केला. बहिष्काराचा मुद्दा लक्षात घेऊन अंनिसतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतीने केलेला ठराव हा सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे उल्लंघन असून, ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. ते बघून ग्रामपंचायतीने ठराव मागे घेऊन माफीनामा दिला आहे, अशी माहिती सामाजिक बहिष्कार विरोधी कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे. मात्र, कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मतदार क्षेत्रात हा सर्व प्रकार होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठराव मागे घेतला तरी प्रकार सुरूच

मजुरांवर सामाजिक बहिष्कार टाकणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये तो गुन्हा आहे. तळवाडे ग्रामपंचायतने असा ठराव मागे घेतला तरी, अनेक गावांत असे प्रकार चालत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यानी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details