नाशिक - द्वारका परिसरात असलेल्या दोन ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांमध्ये गाडी भरण्याचा कारणावरून वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने दुसऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला ऑफिसमध्ये घुसून मारहाण केली आहे. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नाशकात ट्रॅव्हल्स कंपनी मालकांमध्ये वाद होऊन एकाला मारहाण, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद.. - one of them was beaten up and imprisoned on CCTV
नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या दोन ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांमध्ये गाडी भरण्याचा कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला. त्यानंतर एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाकडून दुसऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला ऑफिसमध्ये घुसून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारदार जगदीशसिंह गढवाल यांनी केला आहे.
ऑफिसमध्ये घुसून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी
नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या दोन ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांमध्ये गाडी भरण्याचा कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला. त्यानंतर एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाकडून दुसऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला ऑफिसमध्ये घुसून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारदार जगदीशसिंह गढवाल यांनी केला आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तक्रारदार गढवाल हे मारहाणीत जखमी झाले आहेत.
या मारहाण प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी गढवाल यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराने ट्रॅव्हल्स व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भद्रकाली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.
हेही वाचा -फेरीवाल्यांकडून जमा केली जातेय खंडणी, मनसेचा सेनेवर गंभीर आरोप