महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात अवैध मद्य साठा जप्त, साडेचार हजारांचा मुद्देमाल जप्त - Illegal liquor

शहरामध्ये बेकायदेशीररित्या मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना मिळाली होती. पोलिसांनी एकूण 4 हजार 641 रुपयाचा अवैध माल जप्त केला आहे.

Illegal liquor stores seized in Nashik
नाशकात अवैध मद्य साठा जप्त, साडेचार हजारांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Mar 26, 2020, 10:00 PM IST

नाशिक- कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश बंदची घोषणा केली आहे. दिंडोरीमध्ये लॉकडाऊन असतानाही बेकायदेशीररित्या मद्य विक्री सुरु होती. त्यावर पोलिसांनी कारवाई करत 4 हजार 641 रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त केला आहे.

शहरामध्ये बेकायदेशीररित्या मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना मिळाली होती. पोलिसांनी एकूण 4 हजार 641 रुपयाचा अवैध माल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी कैलास घोलप फरार झाला. पोलीस कर्मचारी हेमंत केदा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दंड संहिता 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, शंकर जाधव, दिलीप पगार, आदी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details