महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेव्ह पार्टी प्रकरण: 25 जणांना जामीन मंजूर, चौकशीसाठी दिले गुन्हे शाखेच्या ताब्यात - रेव्ह पार्टीत २५ जण अटक

मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या अलिशान बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीत सहभागी झालेली अभिनेत्री हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर अशा 25 जणांना अटक करण्यात आली होती. या सर्व संशयित आरोपींना सोमवारी जमीन मंजूर करण्यात आला.

Igatpuri rave party case : Bail granted to 25 persons, all one day police custody
इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण: 25 जणांना जामीन मंजूर

By

Published : Jul 6, 2021, 8:13 AM IST

नाशिक -मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या अलिशान बंगल्यात चाललेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री हिना पांचाळसह अन्य 25 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व 25 संशयित आरोपींचा जामीन अर्ज इगतपुरी न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र चौकशीसाठी या सर्वांना एका दिवसासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण: 25 जणांना जामीन मंजूर

मादक पदार्थांच्या चौकशीसाठी सर्व ताब्यात -

मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या अलिशान बंगल्यात चाललेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. या रेव्ह पार्टीत सहभागी झालेली 'बिग बॉस मराठी’ फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर अशा 25 जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांची सोमवारी सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना इगतपुरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्व संशयित आरोपींना सोमवारी जमीन मंजूर करण्यात आला. मात्र पार्टीतील मादक पदार्थांच्या चौकशीसाठी या सर्वांना एका दिवसासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात देण्यात आले आहे.

रेव्ह पार्टीत वापरलेले बंगलेही पोलीसांनी केले सील -

इगतपुरीत झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस अधिक आक्रमक झाले आहेत. रेव्ह पार्टीत वापरलेले 2 बंगलेही पोलिसांनी सील केले आहेत. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

एक दिवस करणार पोलीस चौकशी -

सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, सर्व संशयित आरोपींनी अमली व मादक पदार्थजवळ बाळगुन सेवन केल्याप्रकरणी आणि वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे. सरकारी वकीलांनी केलेल्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने 25 जणांना जामीन मंजुर केला आणि एका दिवसाच्या तपासासाठी या सर्वांना स्थानीक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा - 'त्या' रेव्हपार्टीतील आरोपींच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details