महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खबरदार..! काम नसताना गावात फिरायला याल तर..! - nashik corona update

मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी कडक पाऊल उचलत शहरातील सर्व प्रमुख तसेच गल्लीत असलेल्या मार्गावर बॅरेकेडिंग केले आहे. यामुळे शहरात आलेला व्यक्ती आता पोलिसांची नजर चुकवून जाणार नाही.

manmad police action
खबरदार..! काम नसताना गावात फिरायला याल तर कारवाईला सामोरे जाल

By

Published : Apr 7, 2020, 7:54 PM IST

मनमाड (नाशिक) - देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यावर आळा बसावा यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. असेच मनमाड शहरात रिकामे फिरणाऱ्या नागरिकांना धाक बसावा यासाठी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. कोणी गावात आला, तर तो पोलिसांच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही, अशाप्रकारे रहदारीची व्यवस्था केली आहे.

खबरदार..! काम नसताना गावात फिरायला याल तर कारवाईला सामोरे जाल

जगासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, जिल्ह्यात आजपर्यंत दोनच रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने शहरात अजून एकही रुग्ण सापडला नाही. रेल्वेचे मोठे जंक्शन असल्याने या ठिकाणी फार भीती होती आणि प्रशासनदेखील गंभीर होते. मात्र, शहरातील काही टवाळखोर तसेच काही सुशिक्षित नागरिकदेखील आपल्या ओळखीचा तसेच पदाचा गैरवापर करत फिरत होते. अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर त्यांना अनेकांना शिक्षादेखील केल्या. मात्र, शहरातील छोट्या मोठ्या गल्लीचा आधार घेवून टवाळखोर पोलिसांना चकवत होते.

मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी कडक पाऊल उचलत शहरातील सर्व प्रमुख तसेच गल्लीत असलेल्या मार्गावर बॅरिकेडिंग केले आहे. यामुळे शहरात आलेला व्यक्ती आता पोलिसांची नजर चुकवून जाणार नाही. तर अनेकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड देखील वसूल केला असल्याचेही साळवे यांनी सांगितले.

शहरत आता टवाळखोर व रिकाम्या फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. यासाठी पोलीस ड्रोन कॅमेरे यासह जागोजागी नाकाबंदी करून कारवाई करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details