महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्री दादा भुसेंचा अजब सल्ला; कांदा परवडत नसेल तर... - Dada Bhuse Advice About Onion

टोमॅटोनंतर आता कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यातच केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के इतके वाढवले असल्याने सर्व बाजार समित्यांमधून निषेध व्यक्त केला जात आहे. याविरुद्ध नाशिकमधील व्यापारी असोसिएशनने कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही परिस्थिती बघता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, असा अजब सल्ला दिला. (Dada Bhuse on Onion Price)

Dada Bhuse Advice About Onion
मंत्री दादा भुसे

By

Published : Aug 21, 2023, 9:07 PM IST

कांद्याविषयी दादा भुसे यांचे विधान

नाशिक : काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के वाढविले आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार संतप्त झाले. केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवले असल्याने सर्व बाजार समित्यांमधून निषेध व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे नाशिकमधील व्यापारी असोसिएशनने कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, असे अजब विधान केले. ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते? असे ते म्हणाले. नाशिकमध्ये कांदा प्रश्नावर त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते. (Dada Bhuse on Onion Price)

कांदा हा संवेदनशील विषय:काही वेळा कांद्याला 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो. काही वेळा २ हजारापर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा याचे नियोजन करावे लागते. नाशिक जिल्ह्यात कांदा हा संवेदनशील विषय आहे. यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील असे नियोजन केले जाईल, असे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला पाहिजे:कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल. नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता, विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला तर काही समस्या नाही. ज्यावेळी आपण 1 लाखांची गाडी वापरतो त्यावेळी 10, 20 रुपये जास्त देऊन माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते? असेही दादा भुसे यांनी म्हटले.

येवल्यात शेतकरी संघटनेचा 'रास्ता रोको':कांदा निर्यात शुल्कात 40 टक्क्यांनी वाढ केल्याच्या निषेधार्थ येवल्यात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर मनमाड-शिर्डी महामार्गावर 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्राने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा:

  1. Onion Markets Closed : कांद्याचा निर्यात शुल्क प्रश्न पेटला; नाशिकमधील मनमाड-येवला मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
  2. Onion Export Ban : निर्यात शुल्क मागे घ्या... अन्यथा खासदार-मंत्र्यांनाही फिरू दिले जाणार नाही- कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा
  3. Maharashtra Onion To Manipur : मनमाडचा कांदा पोहचला हिंसाचारग्रस्त मणिपूरला

ABOUT THE AUTHOR

...view details